कूर येथे मंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघा’चे त्रैवार्षिक अधिवेशन

कोल्हापूर :भुदरगड तालुक्यातील कूर येथील शाहू लॉन येथे आयोजित ‘कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघा’चे त्रैवार्षिक जिल्हास्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. ज्या शिक्षकांनी आयुष्यभर समाजाची जडणघडण केली, त्यांच्या हक्क आणि न्याय्य मागण्यांसाठी संघटित झालेला हा जनसागर पाहून खरोखरच समाधान वाटले. असे मत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले,या अधिवेशनात सेवानिवृत्तांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न केवळ वैयक्तिक नसून ते त्यांच्या सन्मानाशी जोडलेले आहेत, हे या सभेच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवले. ज्या शिक्षकांनी आपले संपूर्ण आयुष्य निष्ठेने समाजाच्या सेवेत व्यतीत केले, त्यांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

यावेळी उपस्थित सर्व शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, त्यांच्या सर्व न्याय्य मागण्या शासन स्तरावर मांडून त्या पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आपल्या गुरुजनांच्या कष्टाचे आणि सेवेचे मोल राखणे हे माझे कर्तव्यच आहे.  शिवाजीराव हावलदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेले हे अधिवेशन अत्यंत प्रेरणादायी होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या मागण्यांना लवकरच यश मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमप्रसंगी  शिवाजीराव बाबासो हावलदार (अध्यक्ष),  एच. डी. पाटील (बाबा) (कार्याध्यक्ष), विठ्ठल दादू बरगे (उपाध्यक्ष), मा. वसंत कृष्णा जोशिलकर (उपाध्यक्ष) व इतर सर्व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ आदी उपस्थित होते.

 

🤙 8080365706