सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबई येथे आधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा

मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून वैदयकीय सेवा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उदेशाने सर जे. जे. रुग्णालय समूह, मंबई येथे विविध अत्याधुनिक वैदयकीय सुविधांचे उदघाटन संपन्न झाले. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधा रुग्णसेवा अधिक गुणवतापूर्ण करण्याबरोबरच ग्रँंट शासकीय वैदयकीय महाविदयालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या उदघाटन समारंभास मा. वैदयकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मश्रीफ, आमदार श्री. मनोज जमसुतकर, प्रधान सचिव श्री. धीरज कुमार, आयुक्त श्री. अनिल भंडारी, तसेच वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

मा. अधिष्ठाता डॉ.. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, उपअधिष्ठाता (पदव्युत्तर विभाग) डॉ. गजानन चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे व सार्वजनिक बांधकाम व इलेक्ट्रिकल विभाग यांच्या समन्वयातून कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधा पुढीलप्रमाणे :

□ १. अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर…..
मेंदूतील गाठ (ब्रेन ट्यूमर) व आघातजन्य शस्त्रक्रिया मेंदूतील रक्तस्राव व मणक्यांशी संबंधित विकारांवरील उपचार, डोक्यावरील गंभीर दुखापतींचे आपत्कालीन व्यवस्थापन, सुरक्षित न्यूरोसर्जिकल हस्तक्षेपासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा.

२. ई. एन. टी. (कान-नाक-घसा) ऑपरेशन थिएटर……
कान, नाक व घसा विकारांवरील शस्त्रक्रिया, टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया, कर्णपटल दुरूस्ती शस्त्रक्रिया, आपत्कालीन ईएनटी सेवा.

३. बाल शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर…..
अर्भक व बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया सेवा, जन्मजात विकृतींचे उपचार, हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया, बालस्नेही पायाभूत सुविधांसह आपत्कालीन सेवा

४. वॉर्ड क्रमांक ११ व १८ चे पायाभूत सुधारणा…..
वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित सुविधा. शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रियेनंतरची सेवा निरीक्षण, तपासणी व पुनर्वसनासाठी सुसज्ज व्यवस्था.

५. केंद्रीय निर्जतुकीकरण सेवा विभाग (CSSD)…..
शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणा. चार ऑपरेशन थिएटरसाठी निर्जतुक साहित्य पुरवठा, रुग्णालयीन स्वच्छता व सुरक्षितता बळकटीकरण.

६. रक्तपेढी आधूनिकीकरण…..
रक्तसाठवण व वितरण सेवा अधिक सक्षम. आपत्कालीन रक्तपुरवठा उपलब्धता, रक्त तपासणी, घटक विभाजन व सुरक्षित प्रक्रिया सुविधा, रक्तदात्यांची नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेत सुधारणा.

७. शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा सहावा मजला सभागृह…..
शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद व संस्थात्मक उपक्रम
सी.बी.एम.ई. स्किल लॅब : आधूनिक वैदयकीय शिक्षण मानकांनुसार सिम्यूलेशन आधारित प्रशिक्षण समारभात मा. वैदयकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची आठवण करून त्यांचे रुग्णसेवा बळकटीकरणासाठी निधी मंजूर केल्याबंददल आभार व्यक्त केले. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता रुग्णांच्या उपचाराच्या गुणवतेत लक्षणीय वाढ घडवून आणेल, असे त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबतच उत्कृष्ट व परवडणारी रुग्णसेवा उपलब्ध करून देणे, हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या सर्वसमावेशक सुधारणा विशेष उपचारांची उपलब्धता वाढविणे, संसर्ग नियंत्रण प्रणाली मजबूत करणे, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वृध्दींगत करणे व शैक्षणिक प्रशिक्षण क्षमता विस्तार करणे यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवा व्यवस्थेला अधिक सक्षम बनवतील. कार्यक्रमाच्या शेवटी वैदयकीय अधीक्षक डॉ. संजय सरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व संबंधितांचे आभार मानले.

🤙 8080365706