महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्या प्रचारार्थ पदयात्रा

कोल्हापूर : समाजकारणाचा आणि राजकारणाचासशक्त वारसा लाभलेले प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्या प्रचारार्थ आज कृष्ण कृष्णाई वसाहत, चव्हाण कॉलनी, रेणुका मंदिर परिसरामध्ये पदयात्रा काढून मतदारांना ओंकार जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 13 मधून महायुती तर्फे माधुरी शशिकांत व्हटकर, रेखा रामचंद्र उगवे, ओंकार संभाजी जाधव व नियाज आरिफ खान हे निवडणूक लढवत आहेत.

महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्या प्रचारार्थ आज कृष्ण कृष्णाई कॉलनी, पाटील वसाहत, चव्हाण कॉलनी, रेणुका मंदिर परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये ओंकार जाधव यांच्या आई सुनंदा जाधव, पुनम शिंदे, अर्चना शिंदे, जानवी मिस्त्री, ललिता राऊत, जयश्री साळुंखे, सीमा बारड, संगीता बारड, आदी महिला, नागरीक सहभागी झाले होते.

तसैच पद्मावती, राधाकृष्ण मंदिर, बेलबाग आदी परिसरात ही महायुतीतर्फे महिलांची रॅली काढून प्रचार करण्यात आला. यामध्ये शिवतेज गुरव, प्रशांत शिंदे, सुनील पाटील आदी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी ललिता राऊत म्हणाल्या संभाजी जाधव यांनी प्रभागांमध्ये पूर्वी विकास कामे केली आहेत. त्याच प्रमाणे ओंकार जाधव हे प्रभागासाठी काम करेल याची खात्री असल्यामुळेच मतदार ओमकार जाधव यांना निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच जानवी मिस्त्री यांनी ओंकार हे लहानपणापासूनच वडिलांच्या विकासकामे पाहत आले आहेत. त्यामुळे तौ वारसा पुढे चालवण्यासाठी ओंकार जाधव यांना मतदार संधी देतील असा विश्वास व्यक्त केला. तर प्रशांत शिंदे यांनी ओमकार जाधव तरुण उमेदवार आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार जो विकास करत आहे. तो विकास कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये होणे गरजेचे आहे. यासाठी मतदार ओंकार जाधव यांना निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.

 

 

🤙 8080365706