महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी: आ. राहुल आवाडे 

कोल्हापूर:माऊली दूध डेअरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ व मान्यवरांचा सत्कार आ . राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते चांदणी चौक, तारदाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माऊली दूध डेअरीच्या उपक्रमाचे कौतुक करत असे सामाजिक व महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत आ.राहुल आवाडे यांनीव्यक्त केले. महिलांच्या कलागुणांना व आत्मविश्वासाला चालना देणारे ‘होम मिनिस्टर’सारखे कार्यक्रम कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित महिलांनी विविध खेळ, प्रश्नमंजुषा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला, माऊली दूध डेअरीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706