नवीन वर्षाच्या सुरवातीला आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव :  आ. सतेज पाटील 

कोल्हापूर :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कदमवाडी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी आ . सतेज पाटील,शांतादेवी डी. पाटील यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले . तसेच परिसरातील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातही दर्शन घेतले. या पवित्र दर्शनाचा अनुभव मनाला समाधान देणारा ठरला. यावेळी आमदार जयंत आसगावकर,  वैजयंती संजय पाटील यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू साबळे, भरत रसाळे, अमर बागी, समीर नलवडे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706