मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कसबा सांगाव येथील  भूमीपूजन व पायाभरणी समारंभ संपन्न

कोल्हापूर:   मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कसबा सांगाव येथील  भूमीपूजन व पायाभरणी समारंभ संपन्न धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला श्री शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर मठ करवीरचे श्री परमपूज्य सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती महास्वामीजी हे उपस्थित होते.

या मंडपाच्या उभारणीमुळे सामाजिक व धार्मिक कार्यासाठी एक चांगला मंच निर्माण होणार असून, गावाच्या सांस्कृतिक समृद्धीत भर पडणार आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य पालक, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे हेमंत परशुराम हरहरे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, सरपंच वीरश्री जाधव, उपसरपंच रेखा आवळे, कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र माने, किरण पास्ते, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, कसबा सांगावचे माजी सरपंच रणजीत कांबळे, अमोल माळी, संभाजी कोपर्डे, उमेश माळी, संतोष माळी, बाळासाहेब स्वामी, बाळासाहेब लोखंडे, मनोज कडोले, अमर कांबळे, सागर चव्हाण, शाम पोतदार, विनोद आवळे, मेहताब मुल्ला, विशाल शेटे, समगोंडा पाटील, धौंडीराम चौगले, सतीश हसुरे, सागर माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706