मुंबई :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक,मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर , तसेच मनसे उपजिल्हा प्रमुख प्रताप पाटील , अँड. महेश खांडेकर यांनी आज बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाठ , शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे , मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर तसेच पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
