कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)पेठ वडगांव(ता.हातकणंगले) येथेली सरसेनापती श्री धनाजीराव जाधव यांच्या 317 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने पुष्प अर्पण करून नम्र अभिवादन केले ,,,
*यावेळी सी.ओ सुमित जाधव, पी आय प्रमोद शिंदे, धनंजय (बंडा) गोंदकर, विजू भाई शहा,डॉ. अभय यादव, राजेंद्र जाधव, युवराज वाळवेकर, विकास कांबळे,राजेंद्र बुरुड, सौरभ शिंदे,ओंकार पाटील, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, दिनेश सनगर, समाधीचे नित्य पूजक आप्पा चव्हाण यासह श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे सर्व धारकरी, महाराष्ट्रातील सर्व शाहीर, नगरपालिका कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज