नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे)
नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे , देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल ( निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदे मध्ये* आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
क्रीडाशिक्षक एस सी साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे आणि प्राणायमचे महत्व सांगून योगासन व प्राणायाम चे विविध प्रकार घेतले .

योग दिनाच्या निमित्ताने सूर्यनमस्कार, भ्रामरी प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शवासन, पर्वतासन, भुजंगासन अशी अनेक आसने घेऊन विद्यार्थी वर्गाला योगासन चा अनुभव दिला. विद्यार्थ्यांनी सुद्धा या आसन आणि प्राणायाम यांचा अनुभव घेतला.
ह्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी योगाचे महत्व कविता, आणि भाषणे ह्यातून व्यक्त केले. योगदिनास मुख्याध्यापक एस टी गावडे, पर्यवेक्षिका एम जी चौगुले यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर उपक्रमास संस्थापक अध्यक्ष मान. प्रतापराव देशमुख, सेक्रेटरी नमिता देशमुख, शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 9921334545