कुंभोज (विनोद शिंगे)
श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी लि इगतपुरीचा नुतन मशीनरी उद्घाटन शुभारंभ नाशिक जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री मा बबनराव घोलप यांच्या शुभहस्ते व सूतगिरणीचे संस्थापक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते वामनदादा खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी दौंडत गावचे सरपंच पांडुरंग शिंदे, स्वामी समर्थ सूतगिरणीच्या चेअरमन डॉ नीता माने, व्हा चेअरमन संघमित्रा गजरे, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने,स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, संचालिका सारिका माने,संचालिका श्रीमती सुनिता चव्हाण, संचालिका रूपाली राजमाने, संचालिका विद्या सोनवणे, संचालिका रोहिणी राजमाने, संचालिका रजनी रोकडे, तज्ञ संचालिका सरस्वती वाकचौरे सूतगिरणीचे आर्किटेक्ट श्रीकांत पाटील, कॉन्ट्रॅक्टर संदीप हवाने, नानासाहेब राजमाने, रत्नाकर गजरे, माजलगाव सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुजित थोरात, विवेकानंद पाटील,माजी पोलीस उपाधीक्षक विलास भोसले, उद्योगपती विजय गलगले, संजय बिडकर, गजानन माने, जनरल मॅनेजर सुरेंद्र अनगली, असिस्टंट जनरल मॅनेजर सुकुमार चव्हाण,चीफ अकाउंटंट संतोष माने,ओंकार माने यांसह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज