कोल्हापूर : महाराणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन आ. राहुल आवादे यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थ, येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व स्वातंत्र्यप्रेमाचे स्मरण केले.
कार्यक्रमात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीतं, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमालेद्वारे या जयंती सोहळ्याला अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी बनवण्यात आले.
महाराणा प्रताप यांच्या बलिदानाची आणि त्यागाची आठवण करून देणारा हा सोहळा, उपस्थित सर्व नागरिकांच्या मनामध्ये अभिमानाची भावना निर्माण करणारा ठरला.