शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा

कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे कोल्हापूरात आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने राज्याचे उद्योग मंत्रीउदय सामंत यांच्या उपस्थितीत रुग्ण सेवकांची संवाद बैठक संपन्न झाली.

 

यावेळी आ. राजेश क्षीरसागर बोलताना “स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे विचारांची प्रेरणा घेत,वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य पुढे घेऊन जातं असल्याबद्दल मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करून जिथं जिथं रुग्णाना शासनाच्या मदतीची गरज आहे, तिथं तिथं ती मदत रुग्णाला मिळेपर्यंत मंगेश चिवटे आणि वैद्यकीय मदत कक्ष स्वस्थ बसत नाही, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.
आणि कोल्हापूरात लवकरात लवकर आयटी पार्क स्थापन करण्याबाबत पुढाकार घेऊन कोल्हापूरात सुसुज्ज आयटी पार्क व्हावे”,अशी विनंती ना. उदय सामंत यांना आ. क्षीरसागर यांनी केली.
या मेळाव्यास वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, गोकुळचे संचालक मा. आमदार सुजित मिणचेकर, वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे,जालंदर पाटील,सिनेनिर्माते,हंबीरराव मोहिते, संदीप मोहिते,एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष बापूसाहेब आडसुळ यांच्यासह रुग्ण सेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545