कोल्हापूर: सिध्दनेर्ली, (ता. कागल) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सिध्दनेर्ली ग्रामस्थांच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी हसनसो मुश्रीफ फौंडेशन शाखा सिध्दनेर्ली यांच्यावतीने दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा, कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या पैलवानांचा व सिध्देश्वर दूध संस्थेच्या नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालकांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चर्मकार व मातंग समाजातील लोकांना प्राॅप्रर्टी कार्डचेही वाटप करण्यात आले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप व भैय्यासाहेब माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विकासराव पाटील, सरपंच दत्ता पाटील, कृष्णात मेटील, सात्ताप्पा पाटील, सुभाष मगदूम, वाय. बी. पाटील, राहुल महाडिक, वनीता घराळ, शिवाजी घराळ, उज्वला पोवार, शाहीर निकम, संदीप पाटील, विजय कुरणे, दत्ता पाटील, तानाजी मगदूम, नवनिर्वाचित संचालक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.