राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 22 हजार 233 हेक्टरील क्षेत्र अवकाळी पावसामुळं बाधित झालं आहे.

मका, ज्वारी,भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसामुळं झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसला आहे.

मे महिन्यात राज्यात अनेक जिल्ह्यांत गेल्या वादळी-वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, बाजरी, मका, हळद, कांदा, टोमॅटो, वाटाणा, चारा यांसह आंबा, काजू, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, संत्रा. पपई, पेरू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात शेती पिकांबरोबरच घरांचे देखील नुकसान झाले होते. तसेच काही ठिकाणी वीड पडून लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत तसेच वीज पडून जनावरे देखील दगावली आहेत.
🤙 9921334545