विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करा – उपायुक्त कपिल जगताप

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. सन 2024-25 मध्ये इयत्ता 1 ली, 2 री KTS, इ. 3 री ते इ. 7 वी प्रज्ञाशोध, तयारी स्पर्धा परीक्षांची व राजर्षि शाहू शिष्यवृत्ती योजना असे उपक्रम प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहेत. यामधील यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज रामगणेश गडकरी हॉल येथे संपन्न झाला. हा सोहळा उपायुक्त कपिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमो प्रास्ताविक व स्वागत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी केले.

    

    उपायुक्त कपिल जगताप यांनी यावळी बोलताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपली ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. ध्येयनिश्चिती लवकर झालेने ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक प्रयत्न व पुरेसा वेळ मिळालेने ध्येयापर्यंत पोहोचता येते. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने राबविलेले विविध उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात याचा निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            या परीक्षांमध्ये महानगरपालिका शाळेतील यशस्वी ठरलेल्या 212 विद्यार्थ्यांना उपायुक्त कपिल जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी व चंद्रकांत कुंभार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  त्या बरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या 155 शिक्षकांचाही ट्रॉफी व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गावडे, स्मिता पुनवतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा.अधिकारी रसूल पाटील यांनी मानले.

या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले. आपल्या पाल्याचा गुणगौरव पाहण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. महानगरपालिकेच्या ‘शाळांमधून निश्चीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे’ अशा प्रतिक्रिया पालकांकडून यावेळी मिळत होत्या. या सर्व परीक्षांचे सनियंत्रण कार्यालयाकडील लिपीक संजय शिंदे यांनी केले. यावेळी जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, सचिन पांडव, राजेंद्र आपुगडे, विक्रमसिंह भोसले, आदिती पोवार, अस्मा गोलंदाज, अर्चना कुंडले, शमा खोमणे, दिपाली नाईक, शांताराम सुतार व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545