श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास स्वप्निल आवाडे यांची भेट

कुंभोज  (विनोद शिंगे)
दिगंबर जैन बोर्डिंग इचलकरंजी येथे श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे.

या पंचकल्याण महोत्सवास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे व आदित्य आवाडे यांनी उपस्थित राहून आचार्य श्री १०८ जिनसेनजी मुनी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी पंचकल्याण कमिटीचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपाध्यक्ष सुभाष बलवान, जैन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सागर शंभूशेटे, सुरेश मगदूम, बाबासाहेब हुपरे, शार्दुल शेटे अमोल शिरगुप्पे, धीरज पाटील, यांच्यासह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

🤙 8080365706