मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाभा अनुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने साकारल्या जात असलेल्या ‘कांदा महाबँक’ या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात विशेष बैठक पार पडली.
या बैठकीत कांदा महाबँक स्थापन करण्यात येत असलेल्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच अद्ययावत पध्दतीने करायच्या इरेडिकेशन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन हा निधी उभारण्यासाठी कर्ज तसेच इतर पर्यायांचा अवलंब करण्यास सुचवले.
यावेळी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, एमएसआरडिसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच एमआयडीसी, भाभा अनुविज्ञान संस्था, हिंदुस्थान ऍग्रो आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.