कोल्हापूर : महापालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट, परवाना विभागांच्या वसुलीचा आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आढावा घेतला. सदरची बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रशासकांनी वसुलीच्या सर्व विभागांची 100 टक्के वसुलीचे उद्दीष्ठ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जे जे मोठे थकबाकीदार आहेत अशा मिळकतीवर संबंधित विभागाने बोंजा नोंद करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, उज्वला शिंदे, नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, स्थानिक संस्था कर अधिक्षक विश्वास कांबळे, रचना व कार्यपध्दती अधिक्षक प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, परवाना अधिक्षक अशोक यादव उपस्थित होते.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घरफाळा विभागाने आजअखेर 67 कोटी 35 लाख वसुली केली आहे. उर्वरीत वसुली करण्यासाठी जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याशी संपर्क करुन रक्कम वसुली करा. संबंधीतांना नोटीस काढल्या असतील तर त्यांच्या मिळकतीवर बोजा नोंद करा. शासकीय थकबाकी असलेल्या सर्व विभागाशी अतिरिक्त आयुक्त व उप-आयुक्तांनी समन्वय ठेऊन 28 मार्च पुर्वी सर्व वसुली करुन घ्यावी. नगररचना विभागाने यावर्षी 100 कोटींवर वसुली नेण्याच्या दृष्टीने विशेष कॅम्पचे आयोजन करुन परवानग्या घ्याव्या.
प्रलंबीत फायलीचा वेळावेळी सहा.संचालक नगररचनाकार यांनी आढावा घेऊन त्याचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. इस्टेट विभागाने 12 कोटी 40 लाख जमा झाली असल्याने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी गाळयांना दर निश्चित करुन दिले असल्याने थकीतसह वसुली वाढवा. थकबाकीदारांना नोटीसा काढून गाळे सिली करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरांना दिल्या. परवाना विभागाने 2 कोटी 76 लाख उद्दीष्ठ केले असून ती मागील वर्षापेक्षा 40 लाखाच्यावर गेलेली आहे. उर्वरीत आठ दिवसात अजून 40 ते 50 लाख वसूल करण्याच्या सूचना परवाना अधिक्षकांना दिल्या. पाणी पुरवठा विभागाने आज अखेर 50 कोटी 30 लाख वसूल करण्यात आली आहे. मोठया थकबाकीदारांवर कारवाई करा त्यांचा पाणी पुरवठा खंडीत करा. तसेच ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे ती वसुल करण्याबाबत जिल्हा परिषदेतील अधिका-यांशी संपर्कात राहून 31 मार्च पुर्वी थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.