मुंबई : शक्तीपीठ महामार्ग विरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट झाली आहे. हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही सभा सुरु असून अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, सचिन अहिर, जयंत आसगांकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के.पी. पाटील यांनी आदोलनामध्ये सहभागी होऊन पाठींबा दर्शविला आहे.