कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रकल्प तसेच इतर उपाययोजनासंदर्भात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात केली.
आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार ८३७ कोटी रुपयांचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट राबवत आहे. त्याचे टेंडर एल अँड टी कंपनीला दिले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होईल असे सरकारकडून सांगितले जात असले तरी अजूनही त्याची निर्धारित तारीख सांगितलेली नाही.सायबर गुन्ह्यातील कॉलची संख्या वाढत आहे. सध्याची आकडेवारी पाहिल्यास या प्रकल्पातील कॉल सेंटर यासाठी कमी पडेल अशी परिस्थिती आहे. या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारचे टूल वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे परवानगी नसताना माहिती गोळा करण्यात येण्याची भिती असून त्याचा येत्या काळात गैरवापर केला जाऊ नये यासाठी नियमावलीव तयार करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. या प्रकल्पामध्ये मनुष्यबळाच्या नेमणूका होत आहेत त्यांचे पगारसुद्धा प्रायव्हेट सेक्टरच्या तोडीचे असले पाहीजेत याकडेही आ.पाटील यांनी लक्ष वेधले.