कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत नोंदणीकृत दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिका दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांकरिता शासन निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी राखीव ठेवून त्याचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत शहरातील दिव्यांगांसाठी गुरुवार, दि.06 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे आरोग्य शिबीर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात अयोजीत करण्यात आले आहे.

 

या शिबीरात दिव्यांगांच्या आवश्यकतेनूसार रक्त व लघवी तपासणी, इ.सी.जी, एक्सरे, टी.बी निदान करणेकरिता स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, जनरल फिजीशीएन यांचेमार्फत मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. यासाठी सावित्रीबाई फुले रूग्णालयाकडील तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या आरोग्य तपासणीचे कामकाज करण्यात येणार आहे.

          तरी शहरातील नोंदणीकृत सर्व दिव्यांगांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत करण्यात आले आहे.

🤙 8080365706