मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले.
२००३ मध्ये रवींद्र नाट्यमंदिराला कला अकादमीचं संकुल लाभलं आणि त्यास पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी असं नामकरण करण्यात आलं.
या कला मंदिराचं नूतनीकरण हे केवळ एक भौतिक बदल नाही तर, तो महाराष्ट्राच्या कला संस्कृतीच्या विकासाच्या अनुषंगानं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
राज्य सरकारने अत्यंत कमी वेळात या अकादमी आणि नाट्यगृहाचे नूतनीकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणच्या नाट्यमंदिरांच्या नूतनीकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने निधीची मागणी करण्याची सूचना करतानाच त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही सांगितले.
या सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, . भाई गिरकर, अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका श्रीम. मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.