प्रशांत कोरटकर यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी : खा. शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी आणि कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तर्फे जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.

या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेस पक्षाचे शहरप्रमुख सचिन चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, हर्षल सुर्वे, भारती पोवार, बबन राणगे, तौफिक मुल्लानी, विनायक घोरपडे, दत्ता टिपूगडे, दुर्वासबापू कदम, रियाज सुभेदार, संजय पटकारे, अवधूत साळोखे, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, वैशाली महाडीक, पूजा आरडे,संजय पटकारे , प्रतिज्ञा उत्तुरे, चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.