पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

कोल्हापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २) जिल्हा नियोजन समितीची बैठक (डीपीडीसी) होणार आहे. दरम्यान आबिटकर यांचे तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी शुक्रवारी आगमन झाले.

 

 

 

रविवारी (दुपारी १२ वाजता) कोल्हापूर महापालिकेच्या नवीन मल्टीस्पेअर टँकरचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना कामकाजाचा आढावा बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहेत. यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. रात्री ८.५० वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने ते मंबईकडे रवाना होणार आहेत.