कोल्हापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक व सांस्कृतिक मंडळाच्या विद्यमाने पायी माघवारी दिंडी प्रस्थान सोहळा आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ह. भ. प. श्री राणू वासकर महाराज यांच्या हस्ते शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे पार पडला.
यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, गोकुळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील ( आबाजी) आणि सर्व संचालक, कोल्हापूर मार्केट कमिटीचे सभापती अॅड. प्रकाश देसाई आणि सर्व संचालक, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, शेतकरी संघाचे उपसभापती राजसिंह शेळके, माजी महापौर वैशाली डकरे, स्थायी समितीचे माजी सभापती राजू डकरे, कमर्शियल बँकेचे चेअरमन अतुल शहा, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक दत्ता वारके, मोहन सालपे यांच्यासह भरत रसाळे, बबन रानगे तसेच कोल्हापूर बाजार उत्पन्न समितीचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.