कुंभोज ( विनोद शिंगे)
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे इचलकरंजीत आले होते आणि आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागांची पाहणी केली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते डायलेसिस विभागाचे तसेच आदर्श शस्त्रक्रिया विभागाचा उद्घाटन करण्यात आले.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि यावेळी आयजीएम हॉस्पिटल 200 बेडवरून 300 बेडवर वाढवण्याचे सांगितले. “आपुरा स्टाफ असला तरी तातडीने मंजूर पदे भरण्यात येतील. नर्सिंग कॉलेज मंजूर असून ते लवकरच सुरू केले जाईल. आठवड्याभरात अपंगत्वाचे दाखले आयजीएम हॉस्पिटलमध्ये दिले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांनी आयजीएम हॉस्पिटलमधील कमतरता, अपुरा स्टाफ, रिक्त पदे आणि इतर समस्यांवर लक्ष वेधले होते. मंत्री आबिटकर यांनी त्यांच्या पाठपुराव्याची प्रशंसा केली आणि आगामी काळात या उपाययोजनांचा फायदा होईल, असे सांगितले. त्यांनी एमआरआय मशीन सुरू करण्याचेही आश्वासन दिले.
या प्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम, आरोग्य उपसंचालक डॉ. सूर्यवंशी, आयजीएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहनी, इन्चार्ज डॉ. मोरे, प्रशासनाधिकारी राजकुमार पाटील, भरत शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, डॉ. मिरजकर यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, ताराराणीच्या महिला अध्यक्ष सौ. उर्मिला गायकवाड, संजय केंगार, कपिल शेटके, विजय पाटील, रवींद्र लोहार, भाऊसाहेब आवळे, उपस्थित होते.