वि.मं. शिंपे शाळेचे धवल यश ; दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिंपे शाळेचा मल्ल कु. संचित बाबासो पाटील यांने ५० किलो वजनी गटात शाहूवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

तसेच सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कथाकथन स्पर्धेत कु. प्रतिक रंगराव पाटील याचा तालुक्यात प्रथम क्रमांक येऊन त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली . त्यांना मार्गदर्शन करणारे शिंपे शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य यांचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706