चंद्रदीप नरके यांची संवेदनशीलता ; अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके हे बाजारभोगाव परिसरात संपर्क दौरा करून परतात असताना वाटेत बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ 2 दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यावेळी चंद्रदिप नरके स्वतः जखमी तरुणांच्या मदतीला धावले.

 

ऍम्ब्युलन्स ची वाट न पाहता या तरुणांना परिसरातील खाजगी गाडी मधून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

तसेच रुग्णालयाचे डीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित तरुणांवर त्वरित उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या तरुणांसोबत आमदार नरके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील सीपीआर रुग्णालयात पाठवले आणि त्यांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

आमदार चंद्रदीप नरके हे जनतेत मिसळून काम करत असतात. त्यांच्या आजच्या या कृतीतून एक संवेदनशील आमदार पाहायला मिळाला.

🤙 9921334545