कुंभोज ( विनोद शिंगे)
वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शन करण्यात आले. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत जे बेताल वक्तव्य केल्यामुळे अमित शाह याचे फोटो फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
वरील घडनेच्या निषेधार्थ उद्या(शनिवार) दि 21/12/2024 रोजी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गाव बंद ठेवत असल्याचे निवेदन कुरुंदवाडचे सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे,तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे, उपाध्यक्ष दिलीप कांबळे,तालुका उपाध्यक्ष किरण कांबळे, तालुका सचिव संदीप कांबळे, तालुका संघटक अजित कांबळे, तालुका सल्लागार मच्छिंद्र कांबळे,तालुका संघटक सुनील सुपेकर, तालुका कोषध्यक्ष बिरू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कांबळे सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल ढाले यासह शिरोळ तालुक्यातील व कुरुंदवाड मधील अनेक नागरिक उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज