आ. अमल महाडिक यांचा खासदार सांस्कृतिक महोत्सवात सत्कार

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूर मध्ये आयोजित केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला आमदार अमल महाडिक उपस्थितीत होते. यावेळी आयोजकांनी आमदार अमल महाडिक यांचा सत्कार केला.

हा सत्कार सदैव स्मरणात राहील. नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान स्फूर्तीदायी आहे.अशा भावना महाडिक यांनी व्यक्त केल्या. या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.