सत्ताधाऱ्यांचा संविधाना पासून मिळणारे सुरक्षा कवच तोडण्याचा प्रयत्न : प्रियंका गांधींचा आरोप

दिल्ली : भारताचे संविधान हे जनतेला सुरक्षेची हमी देतं. विधानामुळे जनतेला न्याय एकता आणि आर्थिक संरक्षण मिळाले आहे परंतु सत्ताधाऱ्यांनी हे सुरक्षा कवच तोडण्याचा प्रयत्न सुरू केला असून खाजगीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचे काम सुरू आहे असा आरोप काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी लोकसभेतील पहिल्या भाषणात केला. भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत चर्चा करताना त्या बोलत होत्या.

 

 

प्रियंका गांधी म्हणाल्या पक्ष हा जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार नाही लोकसभा निवडणुकीत असा निकाल लागला नसता तर सत्ताधाऱ्यांनी संविधान बदलले असते असा आरोप त्यांनी यावेळी केला संविधानामुळे महिलांना सुरक्षा मिळते त्यामुळे संविधान बदलायची भाषा जनता सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

खाजगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात जनतेला शिक्षण अन्न रोजगार मिळवण्याचा अधिकार मिळाला देशातील कुणाची काय परिस्थिती आहे ही समजण्यासाठी जात चंदगड न होणे आवश्यक आहे ही जनतेची मागणी आहे.