‘वंदे मातरम्’, नंतर गायले जाणार ‘जन गण मन’! ;  सार्वजनिक कार्यक्रमातील गीतक्रमात बदल

नवी दिल्ली:राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगान ‘जन गण मन’ हे दोन्ही एकाच कार्यक्रमात गायले जाणार आहेत. यापुढे होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आधी ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘राष्ट्रगान’ सादर केले जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने 3 जून 2026 रोजी घेतला आहे. 

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने तसेच इतर सर्व केंद्रीय मंत्रालयांना याबाबतचे पत्र पाठवून हा क्रम स्पष्ट केला आहे.

 

या नव्या निर्णयानुसार आता सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने होणार आहे. त्यानंतर ‘जन गण मन’ गायले जाणार आहे. गृह मंत्रालयाने ही सूचना सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहे.

 

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी प्रथमच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले जाणार आहे.

 

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशभक्ती वाढवणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

 

🤙 8080365706