उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? : विजय वडेट्टीवार

मुंबई: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाहीय. खातेवाटप निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वारंवार दिल्लीला का जावे लागते. दोघांनाही दिल्लीवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हालणार नाही. वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना तो मिळवावा लागेल. या शब्दात विजय वडेट्टीवर यांनी हल्लाबोल केला आहे. भारतात एकमेव आपला देश असा आहे की जात ईव्हीएम वर निवडणूक होतात. सगळे देश ईव्हीएम वर निवडणूक घेत नाहीत जगाने ज्या गोष्टींना आकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणूक बॅलेट वर निवडणूक झाल्या पाहिजेत बॅलेट पेपर हा अंतिम निर्णय आहे .त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत अशी माहिती विजय वडेट्टीवर यांनी दिली.

दिल्लीत हाय कमांड निर्णय घेणार असून, यासंदर्भात आमचे बोलणे झालेले आहे. या अधिवेशनात आम्ही एकत्र बैठक घेऊ आणि चर्चा करून विरोधी पक्षनेते पदाबाबत भाजपा तयार आहे का ,त्यांची तयारी आहे का, हे त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ असे त्यांनी सांगितले.

🤙 8080365706