कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने केलेल्या कष्टाचे त्यांनी कौतुक केले.
यापुढेही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सर्वसामान्य जनतेला सुरक्षित वाटेल यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा विश्वास दिला.