जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 38.56 टक्के तर करवीर मध्ये सर्वाधिक सरासरी 45.29 टक्के मतदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान झाले.करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी 45.29 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

 

सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 6 तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
271- चंदगड – 39.19 टक्के
272- राधानगरी – 42.82 टक्के
273- कागल – 41.36 टक्के
274- कोल्हापूर दक्षिण – 35.15 टक्के
275- करवीर – 45.29 टक्के
276- कोल्हापूर उत्तर – 35.53 टक्के
277- शाहूवाडी – 41.30 टक्के
278- हातकणगंले – 35.15 टक्के
279- इचलकरंजी – 32.79 टक्के
280- शिरोळ – 37.03 टक्के