महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळणाऱ्या या शासनाला कोल्हापूरचे तरुण माफ करणार नाहीत – मंजित माने

कोल्हापूर : महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळणाऱ्या या शासनाला कोल्हापूरचे तरुण माफ करणार नाहीत व ते वीस तारखेला सरकार विरोधात मतदान करून राजेश लाटकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील असे मनोगत युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

 

 

 

वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क असे अनेक प्रकल्प गेल्या वर्षभरात राज्यातून बाहेर गेले, त्यामुळे लाखो तरुणांच्या नोकरीची संधी गेली. याला हे भ्रष्ट आणि लाचार शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप माने यांनी केला. बेरोजगारी, महागाई, गुंडागर्दी यांनी त्रस्त झालेल्या जनतेला विविध आमिष देऊन फसवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. चार टक्क्याने पैसे उसने आणून कुठेतरी गुंतवायचं आणि नंतर हात जोडत बसायचं अशा भुलभुलय्या मध्ये तरुणाई देखील अडकत चालली आहे. दोन कोटी रोजगाराच्या गप्पा मारून आणि रोजगाराची अनेक विविध फंडे लोकांसमोर सातत्याने मांडून एका बाजूला विकासाचं चित्र उभा करणाऱ्या शासनाने कोल्हापुरामध्ये व या महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प कोणाच्यातरी आनंदासाठी व कोणाचे तरी स्वार्थासाठी गुजरातला पाठवले तर या महाराष्ट्रातले पर्यायाने कोल्हापुरातली युवक काय करणार? स्वतःचे फायदे साठी इतर राज्याच्या तुंबड्या भरून महाराष्ट्रातील तरुणांचा घात कशासाठी असा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. राज्यातील तरुणाईच्या भवितव्याबाबत शासन उदासीन आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मोठे प्रकल्प आता निघून गेलेत. त्यामधून कोल्हापुरातील सुद्धा तरुण नोकरीला लागले असते. रस्ते गटर आणि इतर सांस्कृतिक सेवा सुविधांच्या बरोबरच कोल्हापुरात आयटी पार्क अजूनही सुरू होऊ शकत नाही हे ढुदैव आहे. मोठ्या घोषणा झाल्या पण दुर्दैवानं सध्याच्या राज्यकर्त्यांच्या कडून तरुणांच्या बेरोजगारीला खतपाणी घालण्याचं काम केलं जाते हे दुर्दैवाची बाब आहे असे माने म्हणाले. हा वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये असणारा तरुण या भुलभुलय्या दाखवणाऱ्या आणि निव्वळ घोषणा आणि जुमलेबाज सरकारला मतपेटीद्वारे चोख उत्तर देतील आणि राजेश नाटकर यांच्या प्रेशर कुकर चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून देईल असे माने पुढे म्हणाले. विकासाची निश्चित भूमिका दिशा आणि मार्ग असणाऱ्या माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला व राजू लाटकर यांच्यासारख्या एक निश्चित दृष्टी व विधायक काम करण्याची धमक असणाऱ्या कार्यकर्त्याला या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापुरातील तरुण तरुणी व युवक वर्ग जो या बेरोजगारीला कंटाळलेला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून या महायुती सरकार विरुद्धचा रोष प्रगट करेल असे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने यांनी केले. यावेळी चैतन्य देशपांडे, सानिका दामूगडे, प्रिया माने, अक्षय घाटगे, अभि दाबाडे, शुभम पाटील, प्रथमेश देशिंगे, सुरज देशपांडे, रोहित वेढे, सिद्धेश नाईक व परिसरातील नागरीक व शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.