इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेतील अडचणी दूर करुन मी योग्य तो मार्ग काढेन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर: राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, प्रधानमंत्री सुर्यघर अंतर्गत घरगुती वीज बिलात 30 टक्के कपात करण्यास राज्यात 25 लाख लखपती दिदी करण्यात येतील. तर इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेतील अडचणी दूर करुन मी योग्य तो मार्ग काढेन आणि राहुल आवाडे सुळकूडचे पाणी आणतील, त्यासाठी सर्वांनी विक्रमी मताधिक्यांनी राहुल आवाडे यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ येथील थोरात चौकात आयोजित विजय निर्धार सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 

 

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते व्होट जिहादची भाषा करणार्‍यांचे पाय चाटत आहेत. व्होट जिहादच्या माध्यमातून समाज तोडण्याचे काम केले जात आहे. आता आपण थांबलो तर उठु शकणार नाही. व्होट जिहाद लादू द्यायचे नसेल तर मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल. ही निवडणुक राहलु आवाडे यांची नाही तर हिंदूच्या अस्तित्वासाठीचे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात मतदानरुपी सहभागी होऊन विरोधकांचे नापाक इरादे गाडून रामराज्य आणायु, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण 48 निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे.

उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत. व्होट जिहादचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितला नाही. महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. जी बहुसंख्य मते आहेत. त्यांना पुनर्विचार करावा लागेल आणि एक व्हावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.
सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व त्यांच्या कुटुंबियांनी सहकार रुजविला आहे. तोच वारसा राहुल आवाडे पुढे नेतील. प्रकाश आवाडे लढले असते तर जिंकलेच असते. पण त्यांनी आणि सुरेश हाळवणकर यांनी त्याग करत राहुल आवाडे यांना संधी दिली असून ते दोघे पाठीशी असल्याने रेकॉर्ड ब्रेक तर होणार आहे. आज तीन ठिकाणी सभा झाल्या सर्वच ठिकाणचे उमेदवार राहुलच आहेत. पण हा आमचा राहुल असून ते पप्पू गँगचे मेंबर नाहीत. ते खटाखट वाले नसून फटाफट काम करणारे असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, राहुल आवाडे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर राजवर्धन नाईक-निंबाळकर, रवींद्र माने, अशोक स्वामी, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, अमृत भोसले, शहाजी भोसले, स्वप्नील आवाडे, जयेश बुगड, सौ. अश्‍विनी कुबडगे, सौ. उर्मिला गायकवाड, सौ. वैशाली डोंगरे, जवाहर छाबडा, तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू, श्रीरंग खवरे, अनिल डाळ्या, भाऊसो आवळे, चंद्रशेखर शहा, रुबन आवळे, जयवंत लायकर, संतोष उर्फ बाळ महाराज, पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, विनोद कांकाणी, अभय आरगे, अरविंद शर्मा, विठ्ठल पाटील, अनिल मादनाईक, जालिंदर पाटील उपस्थित होते