कोल्हापूर : करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वडणगे या ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आली . खानविलकर गटाने चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी राजलक्ष्मी खानविलकर या नरके यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत विश्वविजय खानविलकर देखील उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्साह आणि गर्दी, डोळ्याचे पारणे फेडणारी होती.असे मत नरके यांनी व्यक्त केले.
यावेळी नरके म्हणाले, या गर्दीने दाखवून दिलं, वडणगेकरांचं आणि माझं नातं अतूट आहे तसेच येत्या २० तारखेला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन नरके यांनी केले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी वडणगे आणि परिसरातील सामाजिक, राजकीय व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि प्रचंड मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.