कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी निर्धार सभा थोरात चौक, इचलकरंजी येथे संपन्न झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, क.आ. जनता बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, मोश्मी आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना इचलकरंजीचा विकास थांबता कामा नये, तो झेप घ्यायला हवा. या मतदारसंघाला प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचं असेल, तर राहुल आवाडे हेच योग्य नेतृत्व आहे. राहुलजींनी नेहमीच जनतेसाठी काम केले आहे. त्यांच्या अनुभवाने आणि धडाडीने इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलू शकतो. महायुतीच्या माध्यमातून आपण केवळ एक विजय नाही, तर प्रगतीचा पाया घालणार आहोत असे सांगितले.
इचलकरंजीचा विकास, महायुतीचा विजय आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीवर राहुल आवाडेंच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास घडवणार असा विश्वास या सभेतून नेत्यांनी व्यक्त केला. इचलकरंजीच्या जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद आणि नेत्यांचा ठाम निर्धार यामुळे ही सभा विजयाचे द्योतक ठरली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, गजानन महाजन गुरुजी, बाळ महाराज, पुंडलिक जाधव, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, . जवाहरजी छाबडा, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, महावीर गाट, मकरंद देशपांडे, अरविंद शर्मा, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भाजप शहर अध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सावकार मादनाईक, माणगावचे सरपंच राजू मगदूम, अनिल डाळ्या, जयवंत लायकर, शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे, सुनील पाटील, श्रीरंग खवरे, किरण खवरे, चंद्र्शेखर शहा, प्रकाश मोरे, दिलीप मुथा, सतीश डाळ्या, सतीश मुळीक, सुभाष मालपाणी, दिपक राशिनकर, शहाजी भोसले, धोंडीराम जावळे,विनोद कंकानी, ऋषभ जैन ताराराणी महिला अध्यक्षा उर्मिला गायकवाड, भाजप महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष सौ. वैशाली डोंगरे, दिलीप मुथा, उदय धातुंडे अमित जावळे, रुबन आवळे., मोहन मालवणकर, भारत बोंगार्डे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नागरिक, युवक व महिला विक्रमी संख्येने उपस्थित होते..