अरुधंती महाडिकांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 69 तपोवन येथे ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

 

 

“सत्ता असो वा नसो” महाडिक परिवार हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आहे. समाजातील सर्वच घटकांना समान न्याय्य देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. खासदार धनंजय महाडिक साहेब व अमल महाडिक साहेब यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर दक्षिणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध दिला आहे. भविष्यकाळात अजून भरीव कामे व्हावीत यासाठी महायुतीचे सरकार राज्यामध्ये येणे गरजेचे आहे म्हणून अमोल महाडिक साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी अरुधंती महाडिक यांनी केले.

यावेळी मंजिरी महाडिक, प्रमोद पवार, दिलीप जाधव, महेश सावंत, सचिन नाटेकर, . शुभांगी पवार, स्मिता कोगवळे, चंद्रकांत संकपाळ, तुकाराम गावडे, अमर गायकवाड, पल्लवी

🤙 8080365706