कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील इंडिया, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कुंभार गल्ली, शाहूपूरी येथे सभा पार पडली.

यावेळी काँग्रेसचे सचिन चव्हाण, शिवसेनेचे रविकिरण इंगवले, शेकापचे बाबुराव कदम यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप शेट्ये, संजय मोहिते, प्रकाश नाईकनवरे, पूजा नाईकनवरे, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, तसेच शशी बिडकर, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, दिपाली शिंदे, कमलताई पाटील, रहीम बागवान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
