कुंभोज: इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील उमेदवार राहुल आवाडे यांचा प्रचार नियोजन बैठक अमृत मामा भोसले शहर अध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी यांनी बोलताना कार्यकत्यानी जोमाने कामाला लागून राहुल आवाडे यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले,तसेच लवकर इचलकरंजी येथे अल्पसंख्याक समाजाचा भव्य मेळावा घेणार असलेचे सांगितले.
यावेळी उमेदवार राहुल आवाडे ,अशोक स्वामी,आकाशा मुल्ला प्रदेश उपाध्यक्ष भाजप अल्पसंख्याक मोर्चा,यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अनेक पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
या बैठकीस औरंग शेख जिल्हा सरचिटणीस,बानू नदाफ तालुका अध्यक्ष महिला मोर्चा,मा.जीलानी टाकवडे,सय्यद अली देसाई, सलीम शिकलगार,तय्यब गडकर,फारूक बागेवाडी,आयुब खान अत्तर खान जाबीर अली शेख दिलावर लाटकर , हिदायत बागवान,रियाज सनदे, जावेद मुजावर,सलीम मुलाणी, आदिलशहा मुल्ला,वसीम हेरवाडे, आदम शिकलगार, कुमार शिंदे महेश निगवे सुनील गोडसे विकास कांबळे सदाम हिंग्लजकर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.