आबिटकरांची आमदारकी केवळ कंत्राटांसाठी ; पण आमची विकासकामे टक्केवारी मुक्त व दर्जेदारच असणार :के पी पाटील

कोल्हापूर : कसबा तारळे येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले,” विद्यमान आमदारांनी मूळ शिवसेनेशी ५० खोक्यांसाठी केलेली गद्दारी या मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला आवडली नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गद्दारीची गंभीर दखल घेतली आहे. म्हणूनच या गद्दारीला गाढण्याचा पहिला मान राधानगरीकरांना देण्यासाठी पक्षप्रमुखांनी पहिली जाहीर प्रचार सभा या मतदारसंघात घेतली. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या लढाईत मला मोठे बळ दिले असून

 

 

 

 

आमची लढाई ही खोट्या विकासाला बाजूला सारून या मतदारसंघाच्या मूलभूत व दर्जेदार विकासासाठी आहे.”
संजयसिंह कलिकते म्हणाले,”कार्यसम्राट म्हणवणाऱ्यांनी केलेले रस्ते हे चार-सहा महिन्यांत उखडले असून त्यात डांबर किती आणि खडी किती हा संशोधनाचा विषय आहे.”
शिवसेनेचे सुरेश चौगले म्हणाले,”गोडबोल्या व गद्दार आमदारांना घरी बसविण्याचे आम्ही शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना वचन दिले असून ते पूर्ण करुया.”
संजयसिंह पाटील म्हणाले,”के पी पाटील यांनी जशी बिद्री राज्यात भारी चालविली तसा हा विकासात मागे राहिलेला मतदारसंघ अग्रगण्य करण्यासाठी के पी पाटील यांना निवडून देऊया.”
यावेळी राहुल देसाई,विजय मोहिते यांची भाषणे झाली.
भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेसाठी ज्येष्ठ नेते दत्तात्रय हरी पाटील,दत्तात्रय धोंडी पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील,प्रा किसन चौगले,शरद पाडळकर,प्रकाश पाटील, गुरुनाथ पाटील, एन के पाटील, रोहन पाटील,रोहित पाटील, प्रकाश परीट आदी उपस्थित होते.

ठेकेदारी,भागीदारी आणि टक्केवारी हीच त्यांची त्रिसूत्री

के पी पाटील म्हणाले,”ठेकेदारी भागीदारी आणि टक्केवारी ही ज्यांच्या कामाची त्रिसूत्री आहे त्यांच्याकडून दर्जेदार कामे होऊच शकत नाहीत. एकीकडे जनतेच्या विकासाचे खोटे चित्र उभा करायचे आणि त्याच्याआडून स्वतःचे घर भरायचे हे त्यांचे ढोंग आता उघडे पडले आहे.”