राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामीपांडुरंग म्हातुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ज्येष्ठ नागरिक मेळावा भारतीय जनता पार्टी पक्ष शहर कार्यालय, इचलकरंजी येथे संपन्न झाला.

 

 

या संवाद मेळाव्यात राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी नवा अध्याय उलगडण्याचा निर्धार व्यक्त केले. त्यांनी पारदर्शक आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाचे ग्वाही दिले, ज्यातून जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील.

यावेळी भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, राजेश रजपूत, बंडोपंत लाड,उदय धातुंडे यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते.

🤙 8080365706