अकिवाट :धनगरी ढोल, हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराला अकिवाटमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला.

गावातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत लाडक्या बहिणींनी फुलांची उधळण करीत त्यांचे औक्षण केले व लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व त्यांच्या विजयाचा निर्धारही केला.
यावेळी बाळासाहेब नाईक, सलमान बैरागदार, ताजुद्दीन तहसीलदार, बाळासो उमाजे, उत्तम रजपूत, बाबासो नाईक, बाळासाहेब रायनाडे आप्पासाहेब बडबडे, विशाल आवटी, जहांगीर तहसीलदार, आशिष पाटील, तम्मा पाटील, अनिल उगारे, आप्पासाहेब दानोळे, तात्यासाहेब सुतार, विश्वास कांबळे, शिवाजी वाळके, अर्षद मुल्ला, अनिल पाटील, अमीन मकानदार, श्रीराम गुजरे, महावीर पट्टणकोडे, संजय कोथळी, श्रेणीक चौगुले, बाबासो व्हसकल्ले, स्वप्निल शिंदे, शितल हळिंगळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ॲड.अरुण कल्याण्णावर यांनी मानले.
