हसुरमध्ये आमदार यड्रावकर यांच्यावर फुलांचा वर्षाव ; गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

हसूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावर लाडक्या बहिणींनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.या प्रचार फेरीला गावातून मोठा प्रतिसाद मिळाला.येथील वीराचार्य चौकात रॅलीचे सभेत रूपांतर झाले.सभेच्या अध्यक्षस्थानी आप्पासो चौगुले होते.

 

 

यावेळी स्वागत व प्रास्ताविक महावीर पाटील यांनी केले.यावेळी रमेश चौगुले,नेमगोंडा पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कामांचा आढावा मांडला व गावातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हसूरसाठी आज अखेर ९ कोटी ८० लाखांच्या माध्यमातून विकास कामे झालेली आहेत,या पुढील प्रस्तावित कामांसाठी चालना देण्यासाठी मला आपल्या मताच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी,असे आवाहन केले.
यावेळी सरपंच सुनिता चौगुले,बाबासाहेब पाटील,विजय माणगांवे,कलगोंडा पाटील, पायगोंडा पाटील,देवेंद्र कांबळे,महादेव कांबळे, मनोहर चौगुले,शब्बीर मुळे,बाळगोंडा पाटील, बंडू माणगांवे,बाळासो कोळी,कुमार सुतार, अनिकेत पाटील,अभिजीत पाटील,मोहन सुतार यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार चेतन पाटील यांनी मानले.

🤙 8080365706