कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कणेरी गावामध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा पार पडली. गावातील नागरिकांचा पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये उपस्थित नागरिकांशीऋतुराज पाटील यांनी संवाद साधला.

याप्रसंगी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदाशिव स्वामी, कणेरी सरपंच निशांत पाटील, उपसरपंच सुजाता गुरव यांच्यासह अर्जुन इंगळे, एम. बी. पाटील, कणेरी सैनिक संघटना अध्यक्ष कृष्णात कदम, माजी उपसरपंच वैभव पाटील, दत्तात्रय पाटील, रेवणसिद्ध दूधसंस्था चेअरमन सुरेश पाटील, काडसिद्धेश्वर सोसायटी चेअरमन अशोक चोरडे, राहुल शिंदे, बबन केसरकर, विद्या पाटील, पूनम पाटील, कोगील खुर्द सुरेखा कांबळे, विजय पाटील, रमेश पाटील, अमन शिंदे, बाबासो पाटील, पोपट कदम, विलास पाटील यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
