कोल्हापूर: तेरवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. येथील विठ्ठल मंदिर चौकात सभा संपन्न झाली. यावेळी गोसावी समाजाचे प्रमुख रोहित गोसावी दशरथ गोसावी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अब्दुल जमादार, मंगराया देवस्थानचे प्रमुख पिंटू पुजारी व सर्व पुजारी, मातंग समाजप्रमुख शितल गायकवाड,बौद्ध समाजप्रमुख सर्जेराव कांबळे, धनगर समाज भूपाल मगदूम, मंगराया सेवा सोसायटीचे पदाधिकारी, गावातील सर्व महिला बचत गट, कट्टा मंडळ एकता ग्रुप ओंकार मंडळ, धर्मशाळा मंडळ फ्रेंड्स ग्रुप आदींनी आमदार यड्रावकर यांना सभेत जाहीर पाठिंबा दिला.

प्रारंभी स्वागत रामगोंडा पाटील यांनी केले. यावेळी युवराज पाटील, आमगोंडा पाटील, उपसरपंच विजय गायकवाड, राजू मगदूम ओकार कोळी यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेरवाड साठी १२ कोटींच्या निधीतून गावचा कायापालट होत आहे. प्रामुख्याने जलजीवन योजनेच्या माध्यमातून आमदार यड्रावकर यांनी तेरवाडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे नमूद केले.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला, विकासकामाबरोबर तालुक्यातील युवकांसाठी शासकीय योजना, विद्यार्थीनींसाठी मोफत शिक्षण, रिकाम्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी, प्रामुख्याने महिलांना गारमेंटच्या माध्यमातून रोजगार आदी कामे मार्गी लागत आहे.
तेरवाडसाठी यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच येथील प्रसिद्ध देवस्थान मंगराया देवालयाला ब वर्गाचा दर्जा देवून २ कोटींच्या माध्यमातून विकास साधला जाईल असे सांगितले.
यावेळी शाबगोंडा पाटील, उमेश आवळे, शितल गायकवाड, म्हादगोंडा पाटील, विश्वास बालिघाटे, बापूसो कांबळे, बाबासो पाटील, रमेश वडर, दत्तात्रय पाटील, खंडू भोरे, उमेश शेडबाळे, अविनाश वडर, अमोल खोत, आर.डी. मगदूम, किरण धोत्रे, रोहित गोसावी आदी उपस्थित होते.
आभार श्रीशैल्य मठपती यांनी मानले.
