कुंभोज : विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई असून सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार आहे. हातकणंगले मतदारसंघात आमदार राजूबाबा आवळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवूया असे आवाहन माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव आवळे यांनी केले.

भादोले येथील भद्रेश्वर मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. राजूबाबा आवळे यांच्या प्रचार पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजूबाबा आवळे, माजी नगराध्यक्ष संजय आवळे, भादोले गावचे नेते धोंडिराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजीव आवळे पुढे म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. नेत्यांनी पक्ष सोडला परंतु निष्ठावंत शिवसैनिक हा महाविकास आघाडीच्या पाठिशी ठाम आहे.
आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, गेल्या ५ वर्षामध्ये केलेली विकासकामे घेऊन तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी तुमच्या दारी येणार आहे. हा प्रचार नुसता निवडणुकीचा टप्पा नाही तर तुमच्या विश्वासाला मान देऊन, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा संकल्प आहे.आज तुम्ही दाखवलेला प्रतिसाद, दिलेली साथ, ही फक्त पदयात्रेची सुरूवात नसून विजयाचा एल्गार असल्याची खात्री पटली. जनतेच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध असेल अशी ग्वाही देतो.
धोंडिराम पाटील म्हणाले, आमदार राजुबाबा आवळे यांनी भादोले गावासाठी दोन कोटीचा निधी दिला आहे.गावातून मोठे मताधिक्य देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहे.
यावेळी शिवसेनेचे सचिन जाधव यांचे मनोगत झाले. स्वागत व प्रास्ताविक मनोज माने यांनी तर आभार कपिल पाटील यांनी मानले. यावेळी तालुकाध्यक्ष भगवान जाधव, राजाराम कारखाना माजी चेअरमन सर्जेराव माने,माजी सरपंच शशिकांत खवरे, भिवाजी पाटील, माजी पंचायत सदस्य सचिन पाटील, राष्ट्रवादीचे विजय भगवान पाटील, शिवसेनेचे सचिन जाधव, सुरेश पाटील, चंद्रकांत जामदार, भिवाजी पाटील, विजय पाटील, कपिल पाटील, मनोज माने, दिलीप पाटील, बी.एस.माने,
विकास पाटील, संकेत पाटील, गणी सनदे, गणी कवठेकर, हुसैन कवठेकर, समीर सनदे, अमर पाटील, बाजीराव सातपुते, शहाजी सिद, राजवर्धन पाटील, विजय गोरड आदींची उपस्थिती होती.
