कोल्हापूर:शिरोळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे, इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ राहुल आवाडे साहेब, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे, रवी आवाडे साहेब आदि उपस्थित होते.